व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

राज्यातील महिलांसाठी आता मिळणार मोफत सूर्य चूल, असा करा अर्ज

महिलांनो तुमच्यासाठी एक खास बातमी आहे! केंद्र सरकार आणि राज्य सरकार महिला  कल्याणासाठी नवनवीन योजना आणत असतात. यावेळी त्यांनी आणली आहे मोफत सूर्य चूल योजना 2025. आजकाल महागाईने सगळ्यांचीच डोकेदुखी वाढवली आहे. गॅस सिलेंडरच्या किमती गगनाला भिडल्या आहेत आणि सामान्य कुटुंबांना घर चालवणं अवघड झालंय. अशा परिस्थितीत ही योजना खरंच एक वरदान ठरत आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला सूर्यप्रकाशावर चालणारी solar stove मोफत मिळणार आहे. होय बरोबर ऐकलत! बाजारात 20 ते 25 हजार रुपये किमतीची ही सूर्य चूल आता तुम्हाला एक पैसाही खर्च न करता मिळू शकते. चला या योजनेची सविस्तर माहिती घेऊया आणि पाहूया कशी मिळणार ही सूर्याचूल.

सूर्य चूल योजना म्हणजे नेमकं काय?

ही योजना खासकरून ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या महिलांसाठी बनवण्यात आलेली आहे. मोफत सूर्य चूल योजना अंतर्गत सौर ऊर्जेवर चालणारी चूल दिली जाते जी, तुमच्या स्वयंपाकघरात गॅस सिलेंडरची जागा घेईल. ही चूल सूर्यप्रकाशाने Solar चार्ज होते आणि विजेचाही वापर करू शकते. तुमच्या घराच्या छतावर एक solar panel बसवलं जाईल आणि खाली स्वयंपाकघरात स्टोव्ह लावला जाईल. यामुळे तुम्हाला स्वयंपाक करणं सोपं, स्वस्त, आणि पर्यावरणपूरक होईल.

योजनेचे फायदे आणि वैशिष्ट्यं

ही solar stove वापरण्याचे अनेक फायदे आहेत. सर्वात मोठा फायदा म्हणजे ही चूल पूर्णपणे स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त आहे. गॅस सिलेंडरच्या खर्चापासून तुमची सुटका होईल आणि तुम्ही चत ही करू शकाल. ही चूल सूर्यप्रकाशाबरोबरच इतर सहाय्यक ऊर्जास्त्रोतावरही काम करते, त्यामुळे ढगाळ हवामानातही ती वापरता येते. तळणं, शिजवणं, उकळणं असेल अशा सगळ्या स्वयंपाकाच्या गरजांसाठी ही चूल उपयुक्त आहे. सिंगल बर्नर आणि डबल बर्नर अशा दोन प्रकारांमध्ये ही चूल उपलब्ध आहे, किमती वेगळ्या आहेत त्यामुळे तुमच्या गरजेनुसार निवड करता येते. याशिवाय ही चूल वापरणं सोपं आणि सुरक्षित आहे.

हे पहा 👉
Ladki Bahin June Installment Apatra List: लाडकी बहिण योजनेचं मोठं अपडेट! लाखो महिलांचे नाव लाडकी बहिण योजनेतून वगळले!

कोण पात्र आहे या योजनेसाठी?

ही योजना प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील महिलांसाठी आहे. एका कुटुंबातून फक्त एका महिलेलाच या योजनेचा लाभ मिळू शकतो. यासाठी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावं लागतं. अर्ज करताना तुम्हाला उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागेल. ही योजना खासकरून ग्रामीण भागातील महिलांना लक्षात घेऊन बनवली आहे. ज्यांना गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमती परवडत नाहीत.  जर तुम्ही या निकषांमध्ये बसत असाल, तर ही योजना तुमच्यासाठी आहे. तुमच्या गावातल्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून याबद्दल अधिक माहिती घ्या आणि अर्ज करा.

अर्जासाठी लागणारी कागदपत्रं

मोफत सूर्य चूल योजना मध्ये अर्ज करण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रं लागतात. तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, आधारशी लिंक केलेला मोबाइल नंबर, पासपोर्ट साइज फोटो, बँक खात्याचा तपशील, आणि वार्षिक उत्पन्नाचा दाखला असणं गरजेचं आहे. ही सगळी कागदपत्रं नीट जमा केली नाहीत तर तुमचा अर्ज नाकारला जाऊ शकतो. त्यामुळे आधीच सगळी कागदपत्रं तयार ठेवा. जर तुमच्याकडे यापैकी काही कागदपत्रं नसतील, तर जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन ती तयार करून घ्या.

ऑनलाइन अर्ज कसा करायचा?

online अर्ज करणं खूप सोपं आहे. तुम्हाला फक्त इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या अधिकृत वेबसाइटवर, म्हणजेच https://iocl.com/IndoorSolarCookingSystem वर जायचं आहे.

तिथे गेल्यावर तुम्हाला अर्जाचा फॉर्म दिसेल. या फॉर्ममध्ये तुमचं नाव, ईमेल आयडी, कॉन्टॅक्ट नंबर, राज्य, जिल्हा आणि कुटुंबातील सदस्यांची संख्या यासारखी माहिती भरावी लागेल. याशिवाय, तुम्ही वर्षाला किती एलपीजी सिलेंडर वापरता आणि तुमच्या घरात सोलर पॅनलसाठी किती जागा आहे याची माहिती द्यावी लागेल. तुम्हाला सिंगल बर्नर की डबल बर्नर सोलर स्टोव्ह हवं, हेही निवडायचं आहे. सगळी माहिती भरल्यानंतर सबमिट करा.

काही दिवसांत तुमचं नाव यादीत येईल. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन तुम्हाला ही solar stove मोफत देईल. एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

Leave a Comment