व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

लाडकी बहीण योजनेच्या नवीन अपात्र लाभार्थींची यादी जाहीर, नाही मिळणार 1500

महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना अनेक महिलांसाठी जीवनदायी ठरली आहे. परंतु वेगवेगळ्या अटी शर्तींमुळे आणि अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही. आता यातच सरकारने नवीन अपात्र महिलांची यादी जाहीर केलेली आहे त्यामुळे अजून महिलांना योजनेपासून वंचित राहावे लागेल. अपात्र यादीत समाविष्ट असलेल्या लाभार्थ्यांना इथून पुढे 1500 रुपये यांचा हप्ता मिळणार नाही.

लाडकी बहीण योजनेबद्दल थोडक्यात

लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांना आधार देण्यासाठी सुरू केलेली आहे. ही योजना 2024 पासून सुरू करण्यात आलेली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्यांच्या खात्यात पंधराशे रुपये प्रति महिना जमा केले जातात. सरकारने दिलेल्या माहितीनुसार काही दिवसानंतर 2100 रुपये इतकी रक्कम लाभार्थ्यांना मिळणार आहे, त्यामुळे ही योजना समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांना खूपच उपयुक्त आहे.

काही अपात्र लाभार्थी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याचे सरकारच्या लक्षात आल्यानंतर सरकारने याची पडताळणी सुरू केली आहे. या पडताळणीनुसार अपात्र लाभार्थी शोधण्यासाठी सरकारने व्हेरिफिकेशन सुरू केले आहे. इथून पुढे अपात्र लाभार्थ्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे.

लाडकी बहीण योजना पात्रता नियम

ही योजना फक्त अटी शर्ती मध्ये बसणाऱ्या लाभार्थ्यांसाठी आहे. सरकारने लाभार्थ्या पात्रतेसाठी स्पष्ट नियम बनवले आहेत हे नियम खालील प्रमाणे आहेत

  • लाभार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे
  • लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची नागरिक असावी
  • कुटुंबामध्ये कोणाचेही चार चाकी वाहन नसावे..
  • आयकर भरत असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही
  • एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन महिलांना योजनेचा लाभ मिळेल
  • लाभार्थी महिलेचे वय 21 वर्षे ते 65 वर्षाच्या दरम्यान असावे

काही अपात्र लाभार्थी करून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला जात आहे त्यामुळे सरकारने verification सुरू केली आहे. यातूनच अनेक अपात्र लाभार्थी आढळून आले, ज्यांना आता योजनेतून वगळण्यात येणार आहे.

हे पहा 👉
Bandhkam Kamgar Laptop Yojana: कामगार पाल्यांना मिळणार ₹40,000 चा मोफत लॅपटॉप – अर्ज प्रक्रिया सुरू!

अपात्र लाभार्थींची यादी आणि मुख्य कारणं

सरकारने अनेक मार्गाने verification केल्यानंतर अनेक महिलांना अपात्र ठरवलं आहे. यामागची मुख्य कारणं खालीलप्रमाणे आहेत

अपात्रतेचं कारणतपशील
चारचाकी वाहनपुणे जिल्ह्यातील 75,000 महिलांच्या नावावर चारचाकी वाहन असल्याचं आढळलं.
जास्त उत्पन्नकाही कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा जास्त आहे.
चुकीची माहितीकाही महिलांनी अर्जात चुकीची कागदपत्रं किंवा माहिती दिली.
एका कुटुंबातून एकापेक्षा जास्त अर्जएका कुटुंबातील अनेक महिलांनी अर्ज केले, जे नियमाविरुद्ध आहे.

वरील कारणांमुळे लाखो महिलांना योजनेतून बाहेर काढण्यात आलं आहे. विशेषतः, पुणे, नागपूर, आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या संख्येने अपात्र लाभार्थी आढळले आहेत.

राज्यभरात तपासणी मोहीम

लाडकी बहीण योजना अधिक पारदर्शक आणि फक्त गरजू महिलांपर्यंत पोहोचावी यासाठी सरकारने राज्यभरात मोठी verification campaign सुरू केली आहे. यात काय काय होतंय, पाहूया:

  • वाहतूक विभागाने चारचाकी वाहनांच्या मालकांची यादी सरकारला दिली आहे, ज्यामुळे चारचाकी असलेल्या अपात्र महिलांना ओळखणं सोपं झालं.
  • अंगणवाडी सेविका आणि इतर अधिकारी घरोघरी जाऊन कागदपत्रांची तपासणी करत आहेत.
  • ऑनलाइन सिस्टम: mobile app आणि official website (ladakibahin.maharashtra.gov.in) वर अर्जाची स्थिती तपासता येते.

या तपासणीमुळे अनेक bogus applications समोर आल्या, आणि सरकार आता या महिलांना योजनेतून वगळत आहे.

लाडकी बहीण अपात्र लाभार्थी यादी

महाराष्ट्र सरकार ही योजना अधिक प्रभावी आणि पारदर्शक करण्यासाठी काही ठोस पावलं उचलत आहे

  1. अपात्र महिलांना वगळणं: यामुळे निधीचा योग्य वापर होईल आणि खऱ्या गरजू महिलांना लाभ मिळेल.
  2. कठोर पडताळणी: online apply प्रक्रिया आता अधिक कडक होणार आहे, ज्यामुळे चुकीचे अर्ज टाळता येतील.
  3. डिजिटल प्रक्रिया: Nari Shakti Doot App आणि ladakibahin.maharashtra.gov.in वेबसाइटद्वारे लाडकी बहीण योजनेची अपात्रता यादी पाहता येते.

यादी मध्ये नाव असल्यास काय करावे

तुमचे नाव अपात्रता यादीत असेल तर तुमचा अर्ज कोणत्या कारणांमुळे रिजेक्ट झाला आहे हे पहा तुम्ही लाडकी बहीण हेल्पलाइन 181 वर कॉल करून अधिक माहिती मिळवू शकता. अर्ज दुरुस्त करून अचूक माहिती देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत राहील

Leave a Comment