Join WhatsApp Group

Government Scheme: मुलांच्या पालनपोषणासाठी मिळणार ४००० रुपये, मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना सुरू, अर्ज कसा करायचा?

मुलं ही समाजाची व देशाचे भविष्य असतात, पण ज्या मुलांना पालकांचा आधार मिळत नाही, त्यांच्यासाठी आयुष्य खूप कठीण होतं. शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत गरजांसाठी त्यांना सतत झगडावं लागतं. अशा अनाथ आणि निराधार मुलांना सक्षम बनवण्यासाठी सरकारने मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना सुरू केली आहे. ही योजना मुलांना आर्थिक सुरक्षा, शिक्षण आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देते. या योजनेच्या माध्यमातून सरकार अनाथ मुलांना स्वावलंबी बनवतं आणि त्यांना सन्मानाने जगण्याची संधी प्रदान करते. यासाठी सरकार त्यांची 24 वर्षापर्यंत मदत करणार आहे. तर काय आहे ही योजना चला सविस्तर जाणून घेऊया.

मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजनेचा उद्देश

मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना अनाथ मुलांना आर्थिक आणि शैक्षणिक आधार देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश मुलांचा सर्वांगीण विकास करणे आहे. ही योजना मुलांना शिक्षण आरोग्य आणि पालनपोषणाच्या सुविधा देऊन त्यांना आत्मनिर्भर बनवते. यामुळे अनाथ मुलांना समाजात सन्मानाने जगता येतं आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल होतं. हा या योजनेचा उद्देश आहे.

योजनेचे फायदे

मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना अनाथ मुलांना अनेक प्रकारच्या सुविधा आणि लाभ देते. यामध्ये आर्थिक मदत, शिक्षण आणि आरोग्य सुविधांचा समावेश आहे. खालीलप्रमाणे योजनेचे प्रमुख फायदे आहेत:

  • आर्थिक सहाय्य: 18 वर्षांखालील मुलांना दरमहा 4,000 रुपये आणि उच्च शिक्षणासाठी (NEET, JEE, CLAT) 5,000 ते 8,000 रुपये मिळणार.
  • शिक्षण: ITI, Polytechnic, Nursing यांसारखे व्यावसायिक प्रशिक्षण मोफत. याचा खर्च संपूर्ण सरकार उचलणार.
  • आरोग्य: आयुष्मान भारत योजनेअंतर्गत मोफत वैद्यकीय उपचार.
  • आत्मनिर्भरता: इंटर्नशिप आणि रोजगाराच्या संधी. सरकार या सर्व योजना राबवणार.
हे पहा 👉
Aadhar Card block: 1.17 कोटी आधार कार्ड होणार निष्क्रिय; UIDAI ची मोठी कारवाई,-- जाणून घ्या सविस्तर माहिती.

पात्रता निकष आणि आवश्यक कागदपत्रे

मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी काही पात्रता निकष पूर्ण करावे लागतात. खालील तक्त्यात पात्रता निकष आणि आवश्यक कागदपत्रे दिली आहेत:

पात्रता निकष आवश्यक कागदपत्रे
अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आधार कार्ड, शाळेचे ओळखपत्र
मध्य प्रदेशचा कायमचा रहिवासी माता-पित्यांचा मृत्यू दाखला
अनाथाश्रमात किंवा नातेवाईकांकडे राहणारे मूल पासपोर्ट आकाराचा फोटो, बँक पासबुक
कोविड-19 बाल सेवा योजनेअंतर्गत पात्र नसावे मोबाईल नंबर, समग्र आयडी

अर्ज प्रक्रिया

मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना मध्ये अर्ज करण्यासाठी जवळच्या अंगणवाडी केंद्र, महिला आणि बाल विकास विभाग किंवा जिल्हा बाल संरक्षण युनिटला भेट द्या. अर्ज फॉर्म घेऊन सर्व माहिती भरा आणि कागदपत्रांच्या फोटो प्रती जोडा. हा फॉर्म तहसील कार्यालय किंवा जिल्हा परिविक्षा अधिकाऱ्याकडे जमा करा. अधिक माहितीसाठी 9615155005 वर संपर्क साधा किंवा अधिकृत वेबसाईटला भेट द्या. ही योजना नवीन असल्यामुळे अनेक जणांना या योजनेबद्दल माहित नाही. तरी तुम्ही त्यांना सविस्तर माहिती देऊन यासाठी अर्ज करू शकता.

या योजने संदर्भातील नवीन अपडेट्स

मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना मध्ये नुकतेच काही नवीन अपडेट्स समाविष्ट करण्यात आले आहेत. आता 24 वर्षांपर्यंतच्या मुलांना लाभ मिळू शकतो, ज्यामुळे त्यांना उच्च शिक्षण आणि करिअरच्या संधी मिळतील. याशिवाय, व्यावसायिक प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधींना प्रोत्साहन दिले जात आहे. ही योजना अनाथ मुलांना समाजात सन्मानाने जगण्यासाठी आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मजबूत आधार देते. या योजनेचा भरपूर जणांनी लाभ घ्यावा.

मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना अनाथ मुलांसाठी आशेचा किरण आहे. ही योजना आर्थिक मदत, शिक्षण आणि आत्मविश्वास देऊन त्यांचं आयुष्य उज्ज्वल करते. जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर लवकरात लवकर अर्ज करा आणि सरकारच्या या उपक्रमाचा फायदा घ्या.

1 thought on “Government Scheme: मुलांच्या पालनपोषणासाठी मिळणार ४००० रुपये, मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना सुरू, अर्ज कसा करायचा?”

Leave a Comment