महाराष्ट्रातील वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने वीज दर कपात (Electricity Rate Cut) चा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे 70% ग्राहकांना, विशेषतः 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पावसाळी अधिवेशनात हा निर्णय जाहीर करताना फडणवीस म्हणाले की, पुढील काही वर्षे वीज दरात वाढ होणार नाही. हा निर्णय सामान्य माणसाला खऱ्या अर्थाने दिलासा देणारा आहे. फडणवीस सरकारने घेतलेल्या या निर्णयाबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.
वीज दर कपातीचा निर्णय काय आहे?
फडणवीस सरकारने वीज दर कपात अंतर्गत 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी 26% शुल्क कपातीचा निर्णय घेतला आहे. यामुळे 2 कोटी 80 लाख ग्राहकांना फायदा होणार आहे. स्मार्ट मीटरच्या वापरामुळे वीज बिलातील चुका कमी होणार असून, पारदर्शक बिलिंग मिळेल.
- 26% शुल्क कपात: 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या 70% ग्राहकांना फायदा.
- स्मार्ट मीटर: वीज वापराची अचूक माहिती आणि पारदर्शकता असणार.
- सौर ऊर्जा: शेतकरी आणि घरगुती ग्राहकांसाठी सोलर पॅनलचा वापर वाढवणार.
- उद्योगांना प्रोत्साहन: कमी दरात वीज पुरवठा.
- शेतकऱ्यांसाठी सवलत: सौर पंप योजनेद्वारे कमी खर्चात वीज मिळणार.
वीज बिलात किती बचत होणार?
वीज दर कपात मुळे ग्राहकांना दरमहा ₹200-₹250 ची बचत होईल. वार्षिक स्तरावर ही बचत ₹2400 पर्यंत जाऊ शकते. यामुळे ग्राहकांचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
वीज वापर | कपात टक्केवारी | मासिक बचत (अंदाजे) | वार्षिक बचत (अंदाजे) |
---|---|---|---|
0-100 युनिट | 26% | ₹200-₹250 | ₹2400-₹3000 |
101-300 युनिट | 1-3% | ₹50-₹100 | ₹600-₹1200 |
औद्योगिक ग्राहक | 10-12% | ₹500-₹1000 | ₹6000-₹12000 |
स्मार्ट मीटर आणि सौर ऊर्जेचा फायदा
वीज दर कपात सोबतच स्मार्ट मीटर आणि सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यावर सरकारने भर दिला आहे. स्मार्ट मीटरमुळे बिलातील चुका टाळता येतील. सूर्य घर मोफत वीज योजनेंतर्गत सौर पॅनल बसवणाऱ्या ग्राहकांना 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळेल. यामुळे सोलर पॅनल बसवलेल्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
शेतकऱ्यांसाठी विशेष योजना
शेतकऱ्यांना वीज दर कपात चा थेट फायदा मिळेल. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत 10 HP सौर पंप उपलब्ध होणार आहेत. सिंगल पोल योजनेची किंमत फक्त ₹15,000 आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचा वीज खर्च कमी होईल. आणि शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी लागणारा उत्पादन खर्च कमी करण्यात त्यामध्ये शेतकऱ्यांना मोठी मदत होणार आहे.
महाराष्ट्र आघाडीवर
वीज दर कपात मुळे महाराष्ट्रातील वीज दर इतर राज्यांच्या तुलनेत कमी राहतील. सध्या दर ₹8.32 प्रति युनिट आहे, जो ₹7.38 वर येणार आहे. तमिळनाडू (€9.04), गुजरात (€8.98) यांच्या तुलनेत हा कमी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांवर विज बिलाचा जास्त बोजा पडणार नाही.
सामान्य माणसाला दिलासा
हा वीज दर कपात निर्णय मध्यमवर्गीय आणि कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांना मोठा दिलासा देईल. सौर ऊर्जेच्या सबसिडीमुळे दीर्घकालीन फायदा मिळेल, आणि हा निर्णय विकास आणि पर्यावरण संरक्षणात मोलाची भूमिका बजावेल. धन्यवाद..