Ladki bahin june hapta: सध्याच्या घडीला लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय योजना आहे. या योजनेची सुरुवात 2024 मध्ये करण्यात आलेली होती. सध्या योजनेचे एकूण 12 हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहेत. व एकूण 18 हजार रुपये प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये सरकारने दिलेले आहेत. राज्य सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या योजनेचे भरपूर फायदे गरजू महिलांना होत आहेत. प्रत्येक महिन्याला मिळणारे पंधराशे रुपये गरीब कुटुंबाला मोठा आधार ठरत आहे. या योजनेमुळे महिलांच्या जीवनमानात मोठा फरक पडलेला आहे.
लाडक्या बहिणीला जून महिन्याचा हप्ता
लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याचा हप्ता याच महिन्यामध्ये 5 जुलैला वितरित करण्यात आलेला होता. राज्य सरकारने महिला व बालकल्याण विकास विभागाकडे तब्बल 3000 कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आलेला होता. सुरुवातीला अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यावर पंधराशे रुपयांचा हप्ता सरकारने जमा केला. व इतर लाभार्थ्यांना चार-पाच दिवसांमध्ये नेहमीप्रमाणे पैसे मिळतील असे सांगण्यात आले. पण यावेळी परिस्थिती वेगळी ठरली, व अनेक पात्र महिला लाभार्थ्यांना यावेळी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळालेच नाहीत. व अद्यापही या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले नाहीत.
Ladki bahin june hapta
अनेक गरजवंत महिलांनी या हप्त्याची वाट पाहिली होती पण त्यांच्या पदरी निराशाच आली. ज्या महिलांना नेहमी वेळेवर पैसे मिळत होते अशा महिलांनाही यावेळी त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत. काही महिलांच्या खात्यावर पैसे आले व माझ्या खात्यावर आले नाहीत या कारणामुळे महिलांनी बँकेमध्ये चौकशी करण्यास गर्दी केली. सरकारचे सर्व निकष पूर्ण करूनही पैसे मिळाले नाहीत यामुळे महिलांच्या मनामध्ये संताप व राशीची भावना निर्माण झाली आहे. या योजनेवर अनेक महिला अवलंबून आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी ही परिस्थिती खूप कठीण आहे.
सरकारच्या अटी व निकष
राज्य सरकारने लाडकी बहीण योजना चालू करत असताना महिलांवर सात निकष घातलेली होते. व ते निकष पूर्ण होत आहेत का याची चौकशी सध्या सुरू आहे. सरकारने ठेवलेल्या अटी जर महिला पूर्ण करत असतील तरच लाडक्या बहिणींना हप्त्याचे पैसे मिळणार असे सरकारने स्पष्ट केले होते. पण तरीही अनेक महिलांचा दावा आहे की सर्व निकष पूर्ण करूनही आम्हाला या योजनेचे पैसे अजून पर्यंत जमा झालेले नाहीत. यामुळे हप्ता वाटप करताना यावेळी काही त्रुटी झालेली असू शकते असे महिलांचे मत आहे.
महिला तक्रार करू शकतात का?
ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरून अर्ज केलेले होते, फक्त अशाच महिलांना वेबसाईटवर जाऊन तक्रार अर्ज करण्याचा पर्याय सरकारने उपलब्ध करून दिलेला आहे. पण ज्या महिलांनी नारीशक्ती मोबाईल ॲप किंवा ऑफलाइन पद्धतीने अंगणवाडी सेविकांकडे अर्ज केलेला आहे अशा महिलांना अर्ज करण्याचा कोणताही पर्याय सरकारने उपलब्ध करून दिलेला नाही. जास्तीत जास्त महिलांनी नारीशक्ती ॲप व अंगणवाडी सेविकांकडेच अर्ज केल्यामुळे करोडो महिलांवर खूप अन्याय झालेला आहे. त्यामुळे त्या कुठेही तक्रार करू शकत नाहीत.
सरकारने माहिती दिलेली आहे का?
आतापर्यंत जून महिन्याचा हप्ता ज्या महिलांना मिळालेला नाही अशा महिलांना सरकार पैसे परत देणार का याबद्दल सरकारने व महिला व बालकल्याण विभाग विकास यांच्याकडून कोणत्याही प्रकारची अपडेट अजूनही मिळालेली नाही. तसेच किती टक्के महिलांना पैसे मिळालेले आहेत व किती टक्के महिला अजूनही या हप्त्यापासून वंचित आहे याचाही आकडा सरकारने दिलेल्या नाही. सरकारने लवकरात लवकर या विषयावर स्पष्टीकरण द्यावे अशी महिलांची इच्छा आहे.
विधानसभेमध्ये लाडकी बहीण योजनेच्या काही मागण्या
विधिमंडळामध्ये काही आमदारांनी याविषयी मागणी केलेली आहे की, लाडकी बहीण योजनेचा हप्ता आलेला आहे की नाही याचा स्टेटस पाहण्यासाठी, मी या योजनेमधून पात्र झाली आहे की या पत्र झाले आहे याची माहिती मिळवण्यासाठी, पुढील हप्ता किती तारखेला मिळेल याची माहितीसाठी सरकारने वेबसाईट तयार करावी. महिलांनी त्यांचा आधार कार्ड व मोबाईल नंबर टाकल्यानंतर त्यांच्या या योजनेबद्दल संपूर्ण माहिती मिळावी. अशा प्रकारची वेबसाईट तयार करावी असे काही आमदारांचे मत आहे व त्यांनी मागणीही केलेली आहे. अशी व्यवस्था जर सरकारने करून दिली तर अनेक महिलांचे प्रश्न व गैरसमज दूर होण्यास वेळ लागणार नाही. सध्याच्या युगामध्ये अशी सुविधा सरकारकडून उपलब्ध करून देणे हे खूपच सोपे काम आहे.
जुलै महिन्याच्या हप्त्यात 3 हजार रुपये मिळणार
महाराष्ट्रातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना ही खूपच महत्त्वाची आहे. अनेक महिलांचा उदरनिर्वाह या योजनेमधून होत असतो त्यामुळे या योजनेचे पैसे दर महिन्याला वेळेवर मिळावे. अशी अनेक महिलांची मागणी आहे. जर या महिन्यामध्ये म्हणजेच जून महिन्याचे पैसे राहिलेल्या महिलांना जुलै च्या हप्त्यामध्ये सरकार एकत्र वितरित करू शकते. म्हणजेच जुलै महिन्याच्या हत्या सोबत टोटल 3 हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतात. मागील काही हप्त्यांमध्ये ज्या महिला वंचित राहिलेल्या होत्या अशा महिलांना सरकारने पुढच्या हप्त्यामध्ये पैसे वितरित केलेले होते.