Join WhatsApp Group

नमो शेतकरी व pm किसान योजनेचे 5 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा.  तुमचे नाव यादीत तर आहे का? लगेच तपासा..

नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारची पीएम किसान योजना व महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी महासन्माननिधी योजना, या दोन्ही योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकत्र जमा होणार आहेत. पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये व नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये असे एकूण ४ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. जर तुम्ही या दोन्ही योजनांसाठी पात्र असाल तर तुमच्या खात्यामध्ये एकाच वेळेस 4000 रुपये जमा होतील. हे पैसे 18 जुलै किंवा 19 जुलै च्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये येतील.

खरंच पैसे मिळणार का?

पी एम किसान सन्माननिधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहा हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. म्हणजे प्रत्येक हप्त्याला प्रत्येकी दोन हजार रुपये दिले जातात. अशाप्रकारे नमो शेतकरी योजनेचे ही 6000 रुपये दोन हप्त्यांमध्ये दिले जातात. नमो शेतकरी योजना ही फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आहे. जर तुम्ही महाराष्ट्रातील शेतकरी असाल तर तुम्हाला खरंच या योजनेचे पैसे मिळणार आहेत. जर तुम्हाला दोन्ही योजना लागू झाल्या तर पी एम किसान योजनेचे 2000 व नमो शेतकरी योजनेचे 2000 असे मिळून चार हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होतील.

तुमचं यादीमध्ये नाव आहे का?

जर तुम्हाला पीएम किसान व नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनांचा लाभ मिळवायचा असेल तर, तुम्ही या योजनेसाठी पात्र असणे गरजेचे आहे, तर तुम्ही पात्र आहे की नाही हे ओळखण्यासाठी सरकार यादी जाहीर करत असते. या यादीमध्ये तुमचे नाव असेल तर तुम्हाला चार हजार रुपये मिळणार आहेत. 

तुमचं नाव यादीमध्ये आहे की नाही हे तपासण्यासाठी तुमच्याकडे रजिस्टर केलेला मोबाईल नंबर लागतो. हा नंबर टाकून तुम्ही pmkisan.gov.in या वेबसाईटवर तुमचं नाव यादीमध्ये आहे की नाही हे तपासू शकता.

Kyc करणे किती महत्त्वाची आहे?

जर तुम्ही अनेक दिवस तुमच्या बँक अकाउंट ची केवायसी केली नसेल तर तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे केवायसी करणे खूप गरजेचे आहे. केवायसी म्हणजे तुमचं आधार कार्ड बँक खाते आणि मोबाईल नंबर सरकारकडे नोंदणी केलेले असणे.

हे पहा 👉
पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, ई-केवायसी आणि लाभार्थी माहिती जाणून घ्या.

Kyc कशी करायची?

तुम्हाला जर या योजनेसाठी केवायसी करायची असेल तर तुम्ही खालील दिलेल्या पद्धतीनुसार केवायसी करू शकता.

  • गावातील कोणत्याही कॉम्प्युटर सेंटरमध्ये जावा.
  • पी एम किसान योजनेची केवायसी करायची आहे असे त्यांना सांगा.
  • तेथील प्रतिनिधी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर व बँक अकाउंट नंबर मागतील.
  • हे त्यांना दिल्यानंतर बायोमेट्रिकद्वारे तुमची ते केवायसी करतील.
  • अशाप्रकारे केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.

पी एम किसान योजनेचा हप्ता महत्त्वाचा

हे हप्ते शेतकऱ्यांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत, कारण हा पेरणीचा हंगाम असल्यामुळे शेतकऱ्यांना बियाणे खरेदी खते खरेदी व शेताच्या मशागतीसाठी पैसे लागत असतात. शेतकऱ्याचे हातावरचे पोट असल्यामुळे शेतकऱ्यांकडे पैसे नसतात. त्यामुळे शेतकरी या दोन्ही योजनेचा खूप आतुरतेने वाट पाहत असतात. तो दिवस आता जवळ आलेला आहे व शेतकऱ्यांना या योजनेचे पैसे लगेच मिळणार आहेत..

या योजनेचा किती शेतकऱ्यांना लाभ मिळेल.

या योजनेद्वारे महाराष्ट्रातील जवळजवळ 94 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. 93 लाख 50 हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4000 रुपये या येणाऱ्या 18 जुलै रोजी खात्यामध्ये जमा होणार आहेत. जे शेतकरी अपात्र आहेत अशा शेतकऱ्यांना या हप्त्यांमधून वगळले जाणार आहे.

ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी कार्ड नसेल असे शेतकरीही या योजनेमधून वगळले जाणार आहेत.

हप्ता मिळवण्यासाठी काय करणे गरजेचे?

  • पी एम किसान योजनेच्या यादीमध्ये तुमचे नाव आहे की तपासावे.
  • केवायसी प्रक्रिया पूर्ण करा.
  • जर तुम्ही दोन्ही योजनांसाठी पात्र आहात तर तुम्हाला 4000 जमा होतील.
  • मोबाईलवर बँकेने पाठवलेले मेसेज तपासा.
  • काही अडचण असेल तर बियाणे किसान च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या, किंवा गावातील सीएससी सेंटर मध्ये जा.

शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतीसाठी सरकारने दिलेली ही महत्त्वाची रक्कम आहे. या रकमेचा वापर शेतीच्या उत्पादन वाढीसाठी करा व याचा फायदा तुमच्या शेतीसाठी करून घ्या. धन्यवाद…

2 thoughts on “नमो शेतकरी व pm किसान योजनेचे 5 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा.  तुमचे नाव यादीत तर आहे का? लगेच तपासा..”

Leave a Comment