शेतकरी बांधवांनो, आपण गाय किंवा म्हैस माजावर आली की योग्य वेळी लावतो. पण बऱ्याचदा ती गाभण राहत नाही आणि हे कळायला उशीर होतो. त्यामुळे पुन्हा माज येण्याची वेळ निघून जाते आणि दुधाचे उत्पादन थांबते. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. पण आता यावर एक जबरदस्त उपाय आलाय! केंद्र सरकार आणि CIRB (Central Institute for Research on Buffaloes), हिसार यांनी मिळून प्रेग डी किट विकसित केलेलं आहे. ही किट फक्त १० रुपयांत घरबसल्या गाई व म्हशींची गाभण तपासणी करू शकते! चला, जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती.
प्रेग डी किट म्हणजे काय?
ही प्रेग डी किट म्हणजे एक साधी, स्वस्त आणि अचूक गाभण तपासणी यंत्रणा आहे. यामुळे गाय किंवा म्हैस गाभण आहे की नाही, हे तुम्ही स्वतः तपासू शकता. यासाठी जनावरांच्या डॉक्टर कडे जाण्याची गरज नाही. ही किट जनावरांच्या मेडिकल मध्ये लवकरच उपलब्ध होणार आहे आणि ती शेतकऱ्यांसाठी खूपच फायदेशीर आहे. यामुळे वेळ, पैसा आणि मेहनत वाचणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ही किट वापरल्यास त्यांच्या खूपच फायदा होणार आहे.
प्रेग डी किट कशी वापरावी?
प्रेग डी किट वापरणं खूप सोपं आहे. यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:
या किडचा वापर तुम्ही गाभण गेलेल्या गाई व म्हशीवर करू शकता.
- जनावराचं ताजं मूत्र गोळा करा.
- मूत्र किटवर टाकून थोडं थांबा.
- जर किटचा रंग गडद लाल किंवा जांभळा झाला, तर जनावर गाभण आहे.
- जर रंग पिवळा किंवा फिकट राहिला, तर जनावर गाभण नाही.
- महत्वाचं: मूत्र 20-30 अंश सेल्सिअस तापमानात असावं आणि जनावर आजारी नसावं, नाहीतर निकाल चुकू शकतो. त्यामुळे योग्य ती काळजी घ्यावी.
प्रेग डी किटचे फायदे
वैशिष्ट्य | फायदा |
---|---|
वेळेची बचत | गाभण आहे की नाही हे लवकर कळतं, पुन्हा मळवण्याची संधी मिळते. |
कमी खर्च | फक्त १० रुपयांत गाभण तपासणी, पशुवैद्यकाचा खर्च वाचतो. |
दूध उत्पादनात वाढ | लवकर गाभण तपासणीमुळे दूध उत्पादन सुरू होण्यास मदत होते. |
सोयीस्कर | घरबसल्या वापरता येणारी आणि साधी प्रेग डी किट. |
ही प्रेग डी किट शेतकऱ्यांसाठी खूपच उपयुक्त असे साधन आहे. याचे काही प्रमुख फायदे खालीलप्रमाणे:
- वेळेची बचत: गाय म्हैस गाभण आहे की नाही हे लवकर कळतं.
- खर्च कमी: फक्त १० रुपयांत तपासणी करता येते!
- पुन्हा भरवण्याची संधी: जर जनावर गाभण नसेल, तर दुसऱ्यांदा भरवता येतं.
- दूध उत्पादन वाढ: लवकर गाभण तपासणीमुळे दूध उत्पादन लवकर सुरू होतं.
अशा फायद्यांमुळे शेतकऱ्यांना खूपच मदत होणार आहे. व हे प्रेग डी कीट भविष्यामध्ये शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे.
शेतकऱ्यांसाठी का उपयुक्त?
पशुपालनात गाभण तपासणी हा खूप महत्त्वाचा भाग आहे. जर जनावर गाभण नसेल, तर दूध उत्पादन थांबतं आणि शेतकऱ्यांचं नुकसान होतं. या किटमुळे तुम्ही घरबसल्या गाभण तपासणी करू शकता. यामुळे तुम्हाला पशुवैद्यकाकडे जाण्याचा खर्च आणि वेळ दोन्ही वाचतील. शिवाय, ही किट इतकी स्वस्त आहे की छोट्या शेतकऱ्यांनाही ती परवडेल. त्यामुळे या किटचा तिहेरी फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
पशुपालनात होणार खूप मोठा फायदा.
प्रेग डी किट हे पशुपालनातल्या तंत्रज्ञानाचं एक नवं पाऊल आहे. CIRB, हिसार यांनी केलेल्या संशोधनामुळे ही किट शेतकऱ्यांच्या हातात येत आहे. यामुळे गाभण तपासणीचं काम सोपं आणि स्वस्त झालं आहे. ही किट लवकरच बाजारात येणार आहे, त्यामुळे तुमच्या जवळच्या पशुवैद्यकीय केंद्रात याबद्दल विचारा. यामुळे तुमचं दूध उत्पादन आणि उत्पन्न दोन्ही वाढतील!
शेतकरी बांधवांनो, प्रेग डी किट वापरून तुमच्या गाय-म्हशींची गाभण तपासणी करा आणि पशुपालनात यश मिळवा!